स्वातंत्र्यदिवस

सूचना ऐका!

कार्यक्रम संपलाय..तरी प्रत्येकाने आपापल्या धर्मात नीट रांगेत जायचंय..

काही खोडकर मुलं हिरव्या आणि भगव्या वर्गात गोंधळ घालायचा प्रयत्न करतील..तरी संविधान बाईंनी प्रत्येकाला आपापले हक्क आणि मर्यादा समजावूनचं वर्गात सोडायचंय
आणि कोणीही संविधान बाईंना जर त्रास दिला तर न्यायपालिका बाई तुम्हाला कोंबडा करायला घाबरणार नाहीत हे लक्षात राहुदेत!

प्रत्येक वर्गाची जबाबदारी हि त्या त्या संसदेच्या प्रतिनिधींनी घ्यायचिये बरं का..जो प्रतिनिधी जबाबदारी टाळेल त्याला या लोकशाही शाळेच्या प्रणालीतून पायउतार व्हावं लागेल!

सगळयांना खाऊ बरोबर मिळतोय कि नाही हे पोलीस काकांनी काळजीने पाहायचंय,
रस्त्यावर पडलेल्या झेंड्यांची काळजी घ्यायला सामान्य माणसं आहेतच;

आणि शेवटचं म्हणजे..एका दिवसाची देशभक्ती मिरवणाऱ्या मुलांची ‘हजेरी’ घ्यायला विसरू नका पत्रकार सर!

सूचना संपल्या!!

जय हिंद जय भारत!!!